रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- पांझरा नदीतून वावडे परिसरात दिवस-रात्र वाळू उपसा सुरू असून, मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर आणि डंपरच्या माध्यमातून वाळू वाहिली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून, महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा समजते .
मिळालेले माहितीनुसार ग्रामस्थांनी सांगितले की, तलाठी आणि कोतवाल घटनास्थळी येऊनही ठोस कारवाई करत नाहीत. वावडे गावातील तलाठ्यांकडून या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे.
जिल्हाधिकारी यांच्याकडे या संदर्भात लवकरच तक्रार करण्यात येईल. महसूल विभागने तातडीने याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.