अमळनेर :- येथील लायन्स क्लब ऑफ व मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने HPV लसीकरण शिबिराचे यशस्वी आयोजन नर्मदा मेडिकल फाउंडेशन हॉस्पिटल, अमळनेर येथे करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन प्रकाशभाऊ मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले.त्यांनी समाजाच्या आरोग्यासाठी आयोजकांनी दाखविलेल्या बांधिलकीचे विशेष कौतुक केले.
१,२५० मुलींचे लसीकरण.
या शिबिरात एकूण १,२५० मुलींना HPV लस देण्यात आली. गर्भाशय मुखाचा कर्करोग प्रतिबंधासाठी हे पाऊल ऐतिहासिक ठरले.
डी.आर. कन्या शाळा, PBA इंग्लिश मेडियम स्कूल, साने गुरुजी हायस्कूल, योगेश्वर हायस्कूल, लोकमान्य टिळक हायस्कूल, सरस्वती विद्या मंदिर, भगिनी मंडळ स्कूल आदी शाळांतील विद्यार्थीनींनी याचा लाभ घेतला.
या प्रकल्पाचे नेतृत्व अध्यक्ष लायन डॉ. संदीप जोशी, सचिव लायन महेंद्र पाटील, खजिनदार लायन नितीन विंचुरकर, प्रकल्प अध्यक्ष लायन डॉ. मिलिंद नवसरीकर, लायन योगेश मुंदाडे व लायन डॉ. मायुरी जोशी यांनी केले.
त्यांच्या नियोजनशक्ती व संघटित प्रयत्नांमुळे शिबिर अत्यंत यशस्वी पार पडले.
शिबिराला डॉ. युसुफ पटेल,निरज अग्रवाल, डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्रकाश शाह, डॉ. मंजीरी कुलकर्णी, राजू नांडा, विनोद अग्रवाल, प्रशांत सिंघवी,एसदि भरुचा,दिलीप गांधी, महावीर पहाडे, सुनील चौधरी, प्रदीप जैन, प्रदीप अग्रवाल, हरिओम सोनी, प्रितेश मणियार , जितेंद्र जैन , रोनक दोढीवाला, राजेश कुंदनानी, अजय हिंदुजा, प्रशांत सिंघवी, शेखर धनगर जितेंद्र कटारिया, बालू कोठारी, जस्मिन भरुचा, सोनल जोशी, नम्रता हिंदुजा आदी सह मोठया प्रमाणात लायन्स मेंबर उपस्थित होते.
विशेष सहकार्य
कॅन्सर पेशन्ट एड असोसिएशन (CPAA) तर्फे डॉ. नुपूर खरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तसेच लायन किशोर बेहराणी व लायन दिनेश बोरा यांचे मार्गदर्शन मिळाले.
नर्मदा मेडिकल फाउंडेशन हॉस्पिटलच्या स्टाफमधील प्रशांत जोशी, जितेंद्र कांबळे, कुणाल पाटील, जब्बार पिंजारी, भावेश थोरात, अनिल पाटील, प्रमोद, आकाश पाटील, गणेश कोळी, रिंकू, सुनीता, सारा, संदीप पाटील, निलेश यांनी अथक परिश्रम घेतले.
दातृत्वपूर्ण साथ-
मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी या कॅम्पसाठी अर्थसहाय्य करून दातृत्व दाखवले, ज्यामुळे उपक्रम अधिक भव्य स्वरूपात पार पडला.
आरोग्य उपक्रमातील मोठा टप्पा
हे लसीकरण शिबिर म्हणजे लायन्स क्लब ऑफ अमळनेर व नर्मदा मेडिकल फाउंडेशनच्या सामूहिक आरोग्यविषयक ध्येयपूर्तीतील एक भव्य टप्पा ठरला आहे.
अमळनेरच्या आरोग्य इतिहासात ही घटना नोंदवली जाईल, असे सर्व मान्यवरांनी एकमुखाने नमूद केले.