रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- देवगाव येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते.
हिंदी दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन हिंदी विषयाचे शिक्षक आय. आर. महाजन यांनी केले. इयत्ता आठवी, नववी व दहावीतील विद्यार्थ्यांनी “हिंदी – राष्ट्रभाषेचे महत्त्व” या विषयावर प्रभावी मते मांडली.
स्पर्धेत दहावीतील विद्यार्थिनी निशा जाधव, वैष्णवी भरत पाटील, वैष्णवी श्याम पाटील, शुभांगी पाटील, नूतन पाटील व गिरीजा माळी यांच्या हिंदी कवितेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. दुसरा क्रमांक आठवीतील वेदिका धर्मराज पाटील, तिसरा क्रमांक नववीतील अर्पिता बोरसे हिने पटकावला. उत्तेजनार्थ बक्षीस आठवीतील प्रीती जाधव व दहावीतील निशा जाधव हिने मिळवले. परीक्षक म्हणून एच. ओ. माळी यांनी काम पाहिले.
बक्षिसांचे वितरण लवकरच हिंदी शिक्षक आय. आर. महाजन यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक अनिल महाजन म्हणाले, “हिंदी ही केवळ भाषा नसून राष्ट्रीय एकात्मतेचे बंधन आहे. विविध भाषा जोडण्याचे सामर्थ्य हिंदीमध्ये आहे. संपर्काची भाषा म्हणून हिंदीचे महत्त्व अमूल्य आहे.”
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एच. ओ. माळी व एस. के. महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी देवेश पाटील, संभाजी पाटील व गुरुदास पाटील यांनी सहकार्य केले.