रिपोर्टर नूरखान
दिव्यांग मुलांशी संवाद साधून दिला आत्मविश्वासाचा नवा उड्डाण.
जळगाव – जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी नुकतीच ‘उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रा’ला सदिच्छा भेट देत केंद्रातील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह विविध उपक्रमांची माहिती घेतली तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.
दिव्यांग विद्यार्थ्यांशी स्नेहपूर्वक संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कौशल्यांचा गौरव केला आणि त्यांच्यातील आत्मविश्वास व प्रतिभेला दिलेले प्रोत्साहन मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होते.

केंद्रातील उपक्रमांची माहिती.
भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम, कला, खेळ, संगणक शिक्षण आणि स्वावलंबनासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. तसेच केंद्राच्या शिक्षिका आणि प्रशिक्षकांशी संवाद साधून त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

मुलांमध्ये उभारली प्रेरणेची ठिणगी.
या भेटीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये मनोबल, प्रेरणा आणि आत्मविश्वास यांचा नवसंवर्धन झाला असून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी ही एक सकारात्मक पावले ठरली आहेत.
सामाजिक संदेशही अधोरेखित.
“दिव्यांग व्यक्तींना सक्षम करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येण्याची गरज आहे,” असा संदेश श्री. प्रसाद यांनी यावेळी दिला. त्यांनी अशा संस्थांच्या कार्यास सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी उपस्थितांना केले.