रिपोर्टर नूरखान
अमळनेर : – खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेर या नामांकित संस्थेच्या वतीने विविध विकासकामांचे उद्घाटन शनिवारी, ११ ऑक्टोबर रोजी प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडले. या भव्य सोहळ्याला शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह अनेक राजकीय नेते आणि नागरिकांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबराव पाटील होते. उद्घाटक म्हणून जलसंपदा मंत्री मा. ना. गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. संजय सावकारे, खासदार सौ. स्मिता वाघ, तसेच अमळनेरचे आमदार व माजी मंत्री मा. अनिल पाटील उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या पुढील प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले:
र. का. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसीची विस्तारीत इमारत.
इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीची अत्याधुनिक संगणक लॅब.
प्रताप महाविद्यालयातील नविन सेमिनार हॉल.
पी.बी.ए. इंग्लिश मिडियम स्कूलच्या संगणक लॅबचे व्हर्च्युअल उद्घाटन.
या वेळी भाषण करताना मा. गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, “शिक्षण हीच खरी गुंतवणूक असून, या नव्या प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांना संशोधन, तंत्रज्ञान आणि कौशल्यविकासासाठी अधिक संधी उपलब्ध होतील.”
या सोहळ्याला आ. अनुप अग्रवाल, आ. सत्यजीत तांबे, डॉ. बी. एस. पाटील, साहेबराव पाटील, शिरीष चौधरी यांच्यासह अनेक माजी आमदार, स्थानिक पदाधिकारी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र देशमुख, कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष नीरज अग्रवाल, चेअरमन योगेश मुंदडे आदींनी प्रकल्पांच्या विकासाबाबत माहिती दिली.
प्रास्ताविकातून योगेश मुंदडे यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा सादर केला, तर सी.ए. नीरज अग्रवाल यांनी आभारप्रदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. रमेश माने आणि डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त, प्राचार्य, शिक्षक, पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.