रिपोर्टर नूरखान
शांततेत विसर्जन मिरवणूक काढून अनंत चतुर्दशीला श्री सन्मानाचे मानकरी होण्याचे आवाहन.
अमळनेर- शहर व तालुक्यातील गणेशोत्सवात शांततेचे प्रतिक ठरणारे गणेश मंडळ तसेच गणेशोत्सवात सहकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा यंदाही सन्मान होणार असून यासाठी दिनांक 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला सायंकाळ पासून दगडी दरवाजा जवळ भव्य स्वागत मंच उभारून मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान होणार आहे.
तरी सर्व गणेश मंडळांनी अनंत चतुर्दशीला उत्साहात पण शांततेत मिरवणूक काढून यंदाही श्री सन्मानाचे मानकरी व्हावे अशी विनंती वजा आवाहन अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,अमळनेर,श्री मंगळग्रह सेवा संस्था,अमळनेर,आदित्य बिल्डर्स अँड शिव पेट्रोलियम ,व्हॉइस ऑफ मीडिया,अमळनेर,अमळनेर नगरपरीषद,अमळनेर,अमळनेर महसूल विभाग अमळनेर व अमळनेर पोलीस स्टेशन,अमळनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान अमळनेर शहर व तालुक्यात पाचव्या,सातव्या,आठव्या नवव्या दिवशी शांततेत विसर्ज न मिरवणूक काढणाऱ्या मंडळांनी देखील यादिवशी सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.